माय महाराष्ट्र न्यूज: : लोकसभा निवडणुकीच्या तारखा १३ मार्चनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे, असे वृत्त निवडणूक आयोगाच्या सूत्रांचा हवाला देत ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. सार्वत्रिक
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग अनेक राज्यांना भेटी देत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा निवडणूक तारखा जाहीर केल्या जातील, असे निवडणूक
आयोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे, असे वृत्तात म्हटले आहे. (Lok Sabha 2024 Dates)केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ते लवकरत उत्तर प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरलादेखील भेट देतील.
त्यानंतर बुधवार १३ मार्चपूर्वी राज्याचे दौरे पूर्ण होणार असून, यानंतर लोकसभेच्या तारखा जाहीर होण्याची अधिक शक्यता निवडणूक सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या काही
महिन्यांपासून लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) नियमित बैठका घेत आहेत. राज्य
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीत संवेदनशील क्षेत्रे, ईव्हीएमची हालचाल, सुरक्षा दलांची आवश्यकता, सीमेवर दक्षता कडक करणे या सर्व गोष्टी सूचीबद्ध
केल्या आहेत, असेदेखील केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्याने म्हटल्याचे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटले आहे.