Saturday, December 21, 2024

धक्कादायक:वेश्याव्यवसाय रॅकेटप्रकरणी भाजपा नेत्याला अटक

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:श्चिम बंगालमध्ये संदेशखाली घटनेवरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात खडाजंगी सुरू आहे. संदेशखाली येथे

महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारावरून भाजपाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधात रान उठवले आहे. तसंच आता तृणमूलने भाजपाविरोधात शड्डू ठोकला आहे. भाजपा नेते सब्यसाची

घोष यांना वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावरून तृणमूल काँग्रेसने भाजपावर टीकास्र डागलं आहे.भाजपवर हल्ला चढवत टीएमसीने आपल्या अधिकृत हँडलवर एका

पोस्टमध्ये म्हटले की, “बंगालमध्ये भाजपा नेते सब्यसाची घोष यांना त्यांच्या हावडा येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींचे वेश्याव्यवसाय रॅकेट चालवताना पकडले. पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली आणि ६ पीडितांची

घटनास्थळावरून सुटका केली. हे भाजपा आहे. ते मुलींचं संरक्षण करत नाहीत, ते दलालाचं संरक्षण करतात.संदेशखाली येथील अनेक महिलांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या

अनेक नेत्यांवर लैंगिक शोषण आणि जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य शेख शहाजहान हा मुख्य गुन्हेगार असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

जानेवारी महिन्यांत संदेशखाली येथील शहाजनहानच्या घरी जात असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावर हल्ला झाला होता. तेव्हापासून शेख शहाजहान फरार आहे. त्यानंतर महिलांनी त्याच्यावर

लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. तो फरार असल्याने पोलिसांनी त्याचे दोन जवळचे सहकारी शिबाप्रसाद हाजरा आणि उत्तम सरदार या दोन टीएमसी नेत्यांना अटक केली आहे.

बांगलादेश सीमेवरील संदेशखाली गावात शहाजान शेखचा प्रभाव आहे. कौटुंबिक तंटे सोडवण्यात त्याचा पुढाकार असतो. विविध निर्णयात त्याचा शब्द अंतिम असतो असे गावकरी सांगतात.

संदेशखाली १ व २ अशा दोन्ही पंचायती बिनविरोध झाल्या. याखेरीज बशीरहट लोकसभा मतदारसंघात तृणमूलचा खासदार आहे. त्या विजयातही शेखचा वाटा आहे. हा भाग त्या लोकसभा मतदारसंघात येतो.

त्यामुळे पक्षासाठी तो किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. ५ जानेवारीला संदेशखाली येथील घटना उजेडात आली. रेशन घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी छापा टाकण्यासाठी शेखच्या घरी आले असता, त्यांच्यावर जमावाने हल्ला

केला. याच दरम्यान समाजमाध्यमावर एका महिलेची चित्रफीत आली. त्यामध्ये महिलांवर अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महिलांनी संदेशखाली पोलीस ठाण्याला घेराव घातला.

शेखला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर या प्रकरणावरून भाजपाने रान पेटवले. न्यायालयानेही कडक ताशेरे ओढलेत. यामुळे कारवाईसाठी राज्य सरकारवर चौफेर दबाव आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!