Friday, March 29, 2024

सुजय विखेंचा जोरदार हल्लाबोल: आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल

IMG-20240312-WA0002
IMG-20240327-WA0010
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज::राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह शरद

 

पवार गटाला बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाने या चिन्हाचे स्वागत केले असून, विरोधक मात्र शरद पवार गटावर टीका करताना दिसत आहेत.

 

भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिलेल्या तुतारी चिन्हावरून टोला लगावला आहे.मशाली घ्या तुतारी वाजवा. हवे तर त्यांना नव्या तुतारी घेऊन देऊ. मात्र, आता

 

तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल, असा टोला लगावत, चिन्ह देणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेले आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेले आहे.

 

मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यंत बॅलेटवर चिन्ह येत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे

 

पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष’ हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी

 

शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!