माय महाराष्ट्र न्यूज:गावातीलच दोघा हल्लेखोरांनी पिस्तूलातून झाडलेल्या अंदाधुंदी गोळीबारात नेवासा तालुक्यातील बुर्हाणपूर ग्रामपंचायतचे सदस्य व किक बॉक्सिंगचा आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण (वय 23) हे गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान गोळ्या झाडून हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले असून हल्ल्यामागचे नेमके कारण समजले नाही. याप्रकरणी शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, संकेत चव्हाण हे मंगळवार (ता. 15) रोजी घोडेगाव येथून आपले काम आटोपून आपल्या वाहनातून बर्हाणपूर गावी जात असताना ते बर्हाणपूर-चांदे रस्त्यावर घरापासून पाचशे फुटावर रात्रीचे नऊ वाजण्याच्या दरम्यान रस्त्याचे कडेला वाहन उभे करून लघुशंका करत असताना दुचाकीवरून आलेल्या बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर या गावातीच हल्लेखोरांनी पिस्तूलातून संकेत यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या.
रात्रीची सर्वत्र शांतता असल्याने या गोळीबाराचा आवाज सर्वत्र घुमल्याने संकेतच्या वाडीलांसह चुलत बंधू रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत संकेतला त्याच्याच वाहनातून प्रथम जिल्हा रुग्णालयात व नंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
संकेतवर बुधवार (ता. 16) रोजी पहाटे यशस्वी शास्रक्रिया करण्यात येऊन त्याच्या शरीरातून चार गोळ्या काढण्यात आल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती संकेतच्या नातेवाईकांनी दिली आहे.
याप्रकरणी आरोपी आरोपींची ओळख पटली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना असून लवकरच आरोपी अटक होतील.
– सपोनि. सचिन बागुल, शनीशिंगणापूर.