नेवासा/सुखदेव फुलारी
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सन २०२०, २०२१ व २०२२ करिता विविध कृषि पुरस्कार जाहिर झाले असून नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील सौ.पुष्पाताई अर्जुन उर्फ बाळासाहेब नवले यांना सन २०२० चा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार,पाचेगाव(कारवाड़ी) येथील मोहन गंगाधर तुवर यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार तर बेलपिंपळगाव येथील कृषि सहाय्यक निलेश बिबवे यांना सन २०१२ चा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार जाहिर झाला असल्याची माहिती नेवासा तालुका कृषि अधिकारी धनंजय हिरवे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
विभागाचे वतीने राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. त्यानुषंगाने सन २०२०, २०२१ व २०२२ करीता विविध कृषि पुरस्कार जाहिर झाले आहेत. त्यामध्ये भेंडा कृती येथील सौ पुष्पाताई अर्जुन उर्फ बाळासाहेब नवले यांना सन २०२० चा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, पाचेगाव(कारवाड़ी) येथील मोहन गंगाधर तुवर यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार तर बेलपिंपळगाव येथील कृषि सहाय्यक निलेश बिबवे यांना सन २०१२ चा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार -२०२१ (कृषि आयुक्तालय स्तर) जाहिर झाला आहे.
सौ.पुष्पाताई नवले यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून पर ड्रॉप मोर्करोप या संकल्पनेच्या आधारित कमी पाण्यामध्ये केळी आणि अद्रक पीकाचे अधिक उत्पादन घेतले होते.,मोहन तुवर यांनी सेंद्रिय गुळ उत्पादनामध्ये उल्लेखनीय कार्य केले तर कृषि सहाय्यक निलेश बिबे यांनी डाळिंब बाग पाचट व्यवस्थापन व कृषी विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे.