Tuesday, October 15, 2024

चाणक्य नीती:पुरुषांवर नजर पडतात सर्वात आधी ही गोष्ट पाहतात महिला

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कित्येक पुरुष वेगवेगळे फंडे आजमावतात. पण आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये महिलांना कसे पुरुष आवडतात.

महिला कोणत्या पुरुषांकडे आकर्षित होतात, हे आधीच सांगून ठेवलं आहे.‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघर्षणच्छेदनतापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन

कर्मणा।। चाणक्यनीतीमधील या श्लोकात पुरुषांच्या त्या गुणांचा उल्लेख आहे, जे महिलांना आवडतात.चाणक्यनीतीनुसार जो पुरुष आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड प्रती प्रामाणिक असतो, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत

नाही अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.शांत, सरळ आणि सौम्य स्वभावाच्या पुरुषावर महिलांचा जीव लवकर जडतो. महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात. पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात.

आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कुणाला वाटणार नाही. महिलांनाही असाच जोडीदार हवा असतो जो चांगला श्रोता असेल, त्यांचं सर्व ऐकेल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!