माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे अशात पाणीपुरवठा योजनेची वीज कनेक्शन कापू नयेत असे आमचे
माफक अपेक्षा आहे. याबाबत आम्ही टंचाई आढावा बैठकीत वारंवार विषय मांडत आहोत, मात्र अधिकाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे गेल्या आढावा बैठकीमध्ये
आम्ही जे विषय मांडले त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. उलट ज्या नवीन योजना माझ्या मतदारसंघात सुरू आहेत, त्याला भाजपचेच काही कार्यकर्ते आडवे येत आहेत आणि ठेकेदारांना
खंडणी वगैरे मागत असल्याचा आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. पालकमंत्री तिकडे बैठका घेतात मात्र त्यांचे कार्यकर्ते असे आडवे येत असतील तर योग्य नाही असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटल आहे.
अहमदनगरला मिरी येथील तिसगाव प्रादेशिक योजनेचे संथ गतीने सुरु असल्याच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे चांगलेच आक्रमक झाले. सरकार जल जीवन मिशन योजनेचा
गाजावाजा करताय मात्र हर हर जल ही वस्तुस्थिती नसून ग्रामीन भागातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप तनपुरे यांनी केलाय. याबाबत विधानसभेत लक्षवेधी करणार असल्याचा इशारा
देखील त्यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना म्हणजे घर घर जल हे चुकीचं आहे. तसेच गावागावांमध्ये झालेला सर्वे चुकीचा असल्याच देखील तनपुरे यांनी म्हटलं आहे.
ही थातूरमातूर योजना असून याचा देशात गाजावाजा केला जातोय अशी टीका तनपुरे यांनी केली आहे.