माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’हे नाव ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह बहाल केले. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत
शरद पवार गटाला हे चिन्ह वापरता येणार आहे. त्यामुळे आता हे चिन्ह जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी शरद पवार गटाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून
तुतारी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येत आहे. त्यासाठी शरद पवार यांच्यासह सर्वच नेते रायगडावर उपस्थित झाले आहेत.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार
गटाला तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले आहे. याचे अनावरण स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात होणार आहे. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे गडावर पोहचले आहेत.