माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा मतदारसंघामधील इस्लामपूरमध्ये महायुतीचा रयत क्रांती संघटना पुरस्कृत शेतकरी कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये
बोलताना रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बहुजनांचा होईल. तसेच मला देखील खासदार व्हायचं होतं. त्यासाठी हातकणंगले लोकसभा
मतदारसंघात मी रान तयार केलं. त्याची पेरणी देखील केली. परंतु ही जागा शिवसेनेकडे देण्यात आली, असं म्हणाले आहेत.सदाभाऊ खोत म्हणाले की, वळवाचा पाऊस पडल्यासारखं धैर्यशील माने
आले आणि ते खासदार झाले. मला देखील खासदार व्हायचं आहे. त्यामुळे धैर्यशील माने तुम्ही आता थांबता का बघा. आपल्या दोघात आता पहिला फिरण्याची वेळ आली आहे. मला तिकीट मिळालं तर तुम्ही
माझ्या पाठीशी राहा. तुम्हाला तिकडे मिळालं तर मी तुमच्या पाठीशी राहतो. पक्षाकडून आम्हाला शेत नांगराला लावलं जातं. खुरपायला लावलं जातं. पण ऐनवेळी पीक मात्र दुसराच घेऊन जातो. आम्हाला मात्र
बांधावरच बसावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आता मला देखील खासदार व्हायचं आहे.सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, तसेच शरद पवार यांना आता तुतारी मिळाली आहे. तुतारीचा उपयोग फक्त दोन वेळा केला जातो.
लक्ष्मीच्या पावलाने नवरी घरी येताना, नवऱ्याला हळद लागल्यावर आणि स्मशानात जाताना. शरद पवारांना आता तुतारी मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी तुतारी वाजवत स्मशानाकडे जावं, असं धक्कादायक विधान सदाभाऊ खोत यांनी यावेळी केलं आहे.