माय महाराष्ट्र न्यूज: Google नेहमी नवनवीन बदल करत असते. काही दिवसापूर्वी Google ने अमेरिकेत आपली GPay सेवा बंद करणार असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, Gmail बाबतही मोठी माहिती समोर आली आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, गुगल आर्थिक तोट्यामुळे अनेक मोठी पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर Gmail सेवा
बंद करणार असल्याची माहिती समोर आली होती.याबाबत बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, आता यावर गुगलने स्पष्टीकरण दिले आहे. Google एका निवेदनात
सांगितले की, ‘Gmail सेवा बंद होणार नाही, त्याची सेवा सुरूच राहणार आहे. वापरकर्त्यांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही, असं यात म्हटले आहे.जगभरात १८० कोटींहून अधिकजण Gmail वापरतात.
याशिवाय, ही सर्वात लोकप्रिय ई-मेल प्रणाली देखील आहे. जीमेल सेवा बंद झाल्याची बातमी व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.
जीमेल सेवा बंद होणार असल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे गुगनले सांगितले आहे.