माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने ५४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर देशातील बाजारात कांदा भावात वाढ झाली. दोन दिवसांमध्ये कांदा भाव क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांनी
वाढले आहेत. कांद्याला आज सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.बाजारातील कांदा आवक दुसरीकडे टिकून आहे. पण यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील
आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे. तर कांद्याच्या कांद्याच्या भावातील ही वाढ टिकून राहण्याचा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय बाजारत सोयाबीन आणि सोयापेंडच्या
दरावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव तीन वर्षातील निचांकी पातळीवर पोचले आहेत. तर देशातील सोयाबीन आजही दबावात आहे.
सोयाबीनचा भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकाले जात आहे. बाजारातील आवक टिकून आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस
टिकून राहील, असा अंदाज सयोाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. बाजारातील घटती आणि चांगला उठाव, यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली. टोमॅटोचे भाव मागील मागील काही
आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.