Wednesday, May 13, 2026

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:येत्या काही दिवसात राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. पुढील पाच दिवसांत देशाच्या

अनेक भागांत किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर

ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 25 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान पश्चिम

हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि वेगळ्या हलक्या पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.भारतीय हवामान

खात्याने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये

पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.राज्यात पुढील पाच दिवस म्हणजे 29 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 फेब्रुवारीपर्यंत

संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यातही 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत, तीन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय पावसाबरोबर गारपीट होण्याचाही

अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या पाच जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त असेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी

शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असा इशारा विभागाने दिला आहे. गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके, भाजीपाला आणि संत्रा-मोसंबीच्या बहाराला फटका बसला होता.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!