माय महाराष्ट्र न्यूज:मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार
हल्ला चढवला. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवत आहे. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचेही काही चालत नाही. आपण कोणत्या पक्षाचे आहोत, यावर आरोप होत आहे. मी आताच सांगतो मी
कोणत्या पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी समाजाचा आहे. समाज माझ्यासाठी देव आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजासंदर्भात सर्व काही देवेंद्र फडवणीस करत आहे. अजय महाराज बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार यांचे दोन आमदार त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे काही लोक हे काम करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता पण त्यामध्ये आहेत. मी आज टोकाचा निर्णय घेत आहे. मला मारण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. माझे एन्काउंटर करण्याचा
फडणवीस यांचा प्रयत्न आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्या.
एकनाथ शिंदे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करतील. परंतु फडवणीस करू देत नाही. अंतरावालीमध्ये महिलांवर हल्ला झाला. त्या प्रकरणात फडणवीस यांना माफी मागावी लागली. त्यामुळे माझ्यावर
फडवणीस यांचा राग आहे. त्याचे जो ऐकत नाही त्यांना ते संपवतात. त्यांना मला बदनाम करायचे आणि संपवायचे आहे. फडणवीस यांना कोणी पुढे गेलेले आवडत नाही. त्यांच्यामुळे
पक्षातील लोकही त्यांना सोडून जात आहे. खडसे, पटोले फडणवीस यांच्यामुळे सोडून गेले.