Monday, May 6, 2024

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपणासाठी अनुदान

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

ज्या भागात वीज पोहचलेली नाही, तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत परळी

येथील जिरेवाडी येथे सोयाबीन प्रक्रिया उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन विद्यालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.सोमवारी (ता.२६) राज्य अर्थसंकल्पीय

अधिवेशनाला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. २७) विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. राज्यातील ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ जाहीर करण्याचा

प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे, तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री म्हणाले. तसेच केंद्र सरकारने ८ हजार ६१६ कोटी रुपये वस्तु व सेवा कराची (जीएसटी) रक्कम राज्य

सरकारला दिली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.राज्यातील शेतकऱ्यांना वन्यजीव प्राण्यांनी पुरते बेजार केले आहे. त्यामुळे शेताला कुंपण देण्यात यावं, अशी मागणी शेतकरी करत होते.

विधानसभेतही मंगळवारी (ता.२७) विरोधी पक्षाच्या आमदारांनी या विषयाकडे लक्ष वेधले होते.ऊर्जा क्षेत्रात ४० टक्के अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी

राज्यातही रूफ टॉप सोलर योजना लागू करण्यात येत आहे. त्यासाठी ७८ हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे, असेही पवार म्हणाले. सर्व योजनांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी

पुढील दोन वर्षात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा दावाही अर्थमंत्र्यांनी केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!