Sunday, May 19, 2024

मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा:मला १०० टक्के…

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही तापलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

यांनी दिले आहेत. त्यावरून मला १०० टक्के अटक करण्यात येणार आहे, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.मुंबई येथे मोर्चा गेला तेव्हापासून ट्रॅप रचण्याचे काम सुरू आहे.

न्यायालयाने संगीतलं शांततेत आंदोलन करा, आम्ही शांततेत आंदोलन केलं मग गुन्हे का दाखल केले? मला १०० टक्के अटक करणार आहेत. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमची मुलं मोठी

व्हावीत यासाठी मी लढत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.मला सध्या बरं वाटत नाहीये. मी चांगला झालो की पुन्हा दौरा सुरू करणार आहे. संपूर्ण राज्यभर दौरा कारणार आहे. सगळ्या

जातीचे लोक आमच्या बाजूने आहेत. मी जातीला बोललो नाही, मी एकट्याला बोललो मी जातीवादी नाही, असंही जरांगेंनी यावेळी म्हटलंय.माझ्यावर गुन्हा दाखल केल्यावर आम्ही देखील गुन्हे दखल करू.

न्यायालय आम्हाला न्याय देईल. सहा महिने आम्हाला फसवल. जे आमदार अधिकारी आले त्यांच्यावर आम्ही घुन्हे दाखल करणार आहोत. तुम्ही सुरुवात करा मग आम्ही दाखवू काय आहे, असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी पुढे म्हटलं की, मी मागे हटणार नाही त्यांचं म्हणणं १० टक्के आरक्षण घ्यावं आहे. मात्र मी आरक्षण दिलं तरी थांबणार नाही. अटक केली तरी पोलीस ठाण्यात बसुन मी आंदोलन

करणार आहे.तिथे मला काही झालं तरी मी मागे हटणार नाही. १० टक्के आरक्षण ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं मात्र आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहजे, अशा शब्दांत जरांगेंनी पुन्हा एकदा ठाम शब्दांत आपली भूमिका मांडलीये.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!