Wednesday, February 12, 2025

कोण कुठे लढणार जवळपास निश्चित, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; महाविकास आघाडीची निर्णायक बैठक

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. 48 जागांपैकी

कोणती जागा कुणी लढवायची हे आजच्या बैठकीत जवळपास निश्चित झाले आहे. प्रत्येक जागा जिंकण्याच्या ईर्षेने लढवायची असा निर्धार करण्यात आला असून उद्या आमची निर्णायक बैठक

होईल, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंबंधी आज महाविकास आघाडीची बैठक

पार पडली. 48 जागांवर कोणी कुठे लढायचं यावर आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे, असे नमूद करतानाच

जागावाटपावर उद्याची बैठक शेवटची असेल. त्यानंतर जागावाटपासाठी पुन्हा बैठक होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.वंचितचे प्रतिनिधी आज बैठकीला हजर होते. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही सातत्याने

संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे. उद्या पुन्हा आम्ही चर्चेसाठी बसणार आहोत. उद्यानंतर जागाकाटपाकर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही. वंचितचे प्रतिनिधी आज चांगला आकडा घेऊन

समाधानाने गेले आहेत. आता त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्तावावर चर्चा होईल आणि उद्या पुन्हा सुहास्यवदनाने ते आमच्या बैठकीत सहभागी होतील. बैठकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण,

बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!