Wednesday, February 12, 2025

रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्री विखेंची माहिती

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुन्हा दाखल करणार

असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याचं

विखे म्हणाले आहेत. अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.विखें म्हणाले की, “तुम्ही एखादं बेताल वक्तव्य करता, मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा, तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे .

म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवान परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु

केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असा इशारा” राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान मला शरद पवारांनी राजकारणात येऊ दिलं नाही म्हणून अजित पवारांचा

मार्ग सुकर झाला असं वक्तव्य राजेंद्र पवारांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आले. याबाबत बोलतांना राधाकृष्ण विखेंनी म्हटले आहे की, “मी त्यांचं विधान ऐकलं नाही. मात्र, रोहित पवारांना

तो सूचक इशारा असला पाहिजे की, फार धावपळ करू नको जशी अजित दादांची फसवणूक झाली. तशी तुझी देखील फसगत झाल्याशिवाय राहणार नाही.

हेच त्यांना त्यांच्या वक्तव्यातून सूचित करायचे असेल असे मला वाटते असं विखेंनी म्हंटल आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!