माय महाराष्ट्र न्यूज: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी(दि.28) शेतकऱ्यांसाठी चालवली जाणाऱ्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या 16व्या हप्त्याचे वाटप केले. या हप्त्यात
21,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्याचा फायदा देशातील 9 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना होणार आहे. पंतप्रधानांनी
यवतमाळमधील कार्यक्रमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले.ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान लाभार्थी म्हणून 16व्या हप्त्यासाठी अर्ज केला आहे, त्यांच्या खात्यात या थेट पैसे येतील.
तुम्ही सुद्धा PM किसान लाभार्थी असाल, तर लाभार्थी स्थिती तपासून तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे तुम्ही पाहू शकता.सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर
जा – https://pmkisan.gov.in/येथे होमपेजवर ‘नो युवर स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.आता तुमच्या समोर एक पेज उघडेल, जिथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर आणि कॅप्चा आणि OTP टाकाल.
यानंतर तुम्ही तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीची स्थिती पाहू शकता.