Tuesday, June 17, 2025

नगर जिल्ह्यातील नागरिकांनो पुढील इतके दिवस जिल्ह्यात गारपीटसह पावसाची शक्यता

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कधी ढगाळ वातवरण होत आहे.

काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 28 फेब्रुवारी ते 1 मार्च (बुधवार-शुक्रवार) असे 3 दिवस खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली,

कोल्हापूर आणि सोलापूर अशा 10 जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत जेष्ठे

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे. जाणवत आहे. दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर अशा 5 जिल्ह्यात व लगतच्या परिसरात

आजपासून 1 मार्चपर्यंत असे 3 दिवस गारपीटीचीही शक्यताही जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यात आज 28 फेब्रुवारी ते 2 मार्च (बुधवार- शनिवार) असे 4 दिवस ढगाळ

वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. बुधवार आणि गुरुवार

28 आणि 29 फेब्रुवारीला 2 दिवस मराठवाडयात गारपीटीचीही शक्यताही जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 1 आणि 2 मार्च

असे 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. तर मुंबईसह कोकणातील

7 जिल्ह्यात आज व उद्या बुधवार आणि गुरुवार 28 – 29 फेब्रुवारी असे 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची

शक्यता जाणवत आहे. विदर्भ व कोकणात गारपीटीची शक्यता जाणवत नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!