माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे घोषणा जाहीर करण्यात आली.
दरम्यान मागच्या वर्षभरात राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन टप्प्यात पैसे देण्यात आले. परंतु राज्यातील अद्याप काही पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. यावर
आता राज्य सरकारकडून पुढच्या काही दिवसात तिसरी यादी लवकरच जाहीर करून खात्यावर पैसे जमा करण्याच्या तयारीत आहे.यामध्ये नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना
लाभ मिळाला नव्हता तसेच तांत्रिक अडचणीमुळे एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसल्याने अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित रहावं लागलं होते.
यावर आता सरकारने नवा नियम करत दोनदा उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार असल्याची माहिती दिली. याबाबतची माहिती राज्य शासनाने मागवली आहे.
पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले. बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला; पण तांत्रिक अडचणीमुळे काहीजण अनुदानापासून वंचित राहिले होते.