Sunday, October 6, 2024

भाजपने लढवला फंडा:तुम्हीच सांगा कसा असा जाहीरनामा…

माय महाराष्ट्र न्यूज:. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी

सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. परंतु भाजपकडून जय्यत तयारी आणि नियोजन केले जात आहेत. भाजपने महाराष्ट्रातील लोकसभांच्या जागांसाठी २३ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

तसेच भाजपने जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी यावर्षी प्रथमच वेगळी कल्पना राबवली आहे. जाहीरनाम्यासाठी भाजप जनतेचे मत घेणार आहेत. जाहीरनाम्यात कोणते

मुद्दे असावेत यासाठी जनमत घेणार आहे. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून जनतेच्या सूचना मागवणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा जनतेसमोर

मांडत असतो. मात्र यावेळी भाजपने जाहीरनाम्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांच्या समावेश

करावा तसेच विकसित भारत कसा असावा यासाठी भाजपाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. १५ मार्चपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना पक्ष कार्यालयात पाठवाव्यात , असे आवाहन भाजपकडून करण्यात आलंय.

चांगल्या सूचनांचा संकल्पपत्रात समावेश करावा या हेतूने हे अभियान सुरु करण्यात आले आहे. नमो ॲप, ट्वीटर सारख्या अशा विविध मार्गानेही नागरिक भाजपाला सूचना करू शकतात, असे भाजपकडून

सांगण्यात आलेय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी ”विकसित भारत – मोदी की गारंटी रथ” (व्हिडीओ व्हॅन ) सर्व लोकसभा मतदारसंघांत फिरणार आहे.

त्याद्वारेही सामान्य नागरिकांना आपल्या सूचना भारतीय जनता पार्टीकडे कळविता येणार आहेत.या व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून २५० ठिकाणी समाजातील वेगवेगळया घटकांशी संवाद साधला जाणार आहे.

या संवादातून आलेल्या सूचनांचाही समावेश संकल्प पत्रामध्ये केला जाणार आहे. 15 मार्चपर्यत सूचना पक्ष कार्यालयात पाठवण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

9090902024 या क्रमांकावरही नागरिकांना जाहीरनामा कसा हवा याच्या सूचना देता येणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!