Monday, May 27, 2024

मार्चच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका; LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात

ही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. देशभरातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस

सिलिंडरच्या किमतीत बदल करतात.आजही गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला आहे. त्यानुसार, १ मार्चच्या पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे

दर २५.५० रुपयांनी महागले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांची वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅसचे दर १ हजार ७४९ रुपये इतके झाले आहेत. तर दिल्लीत १,७९५ रुपये, कोलकात्यात १,९११ रुपये,

आणि चेन्नईत १,९६० रुपये असेल. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमतीत १४ रुपयांची वाढ करण्यात आली होती.त्याच्या एक महिना आधी म्हणजे जानेवारी महिन्यात १९ किलोच्या

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) दरात १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा मार्चच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम

सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. कारण, बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.एकीकडे व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली असली, तर दुसरीकडे

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९०२.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये,

चेन्नईत ९१८.५० रुपये इतका आहे. यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती सिलिंडरचे दर बदलले होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!