Sunday, December 22, 2024

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना येत्या ३१ मेपर्यंत स्थगिती 

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्य शासनाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना येत्या ३१ मेपर्यंत स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात

३८ हजार ७४० सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यापैकी राज्यात १० हजार ७८३ निवडणुकांची प्रक्रिया सुरू असतानाच हा निर्णय झाला आहे.आगामी लोकसभा

निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार पणन विभागाने यासंदर्भात आदेश काढला आहे.राज्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेर निवडणुकीसाठी पात्र असलेल्या ९३ हजार

३४२ सहकारी संस्थांपैकी ५० हजार २३८ सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. मागील २०२३ वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत ९३ हजार ४४२ निवडणुकांसाठी पात्र होत्या. त्यापैकी ५० हजारांहून अधिक

सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या.उर्वरित सहकारी संस्थांपैकी १० हजार ७८३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती. तर २० हजार १३० सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र प्रलंबित

आहेत. तसेच यंदाच्या २०२४ या वर्षात ७,८२७ सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सगळ्या मिळून ३८ हजारांहून अधिक सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे.

सहकार विभागाकडून निवडणुकांची तयारी सुरू असतानाच देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सहकार विभागाने उच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश दिलेल्या निवडणुका वगळून येत्या

३१ मे २०२४ पर्यंत सरसकट सगळ्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे.राज्यात ९३,३४२ निवडणूक संस्था पात्र आहेत यातील १०,७८३ सहकारी

संस्थांची प्रक्रिया सुरू आहेत तर २०,१३० संस्थांची कामे प्रलंबित आहेत तर ७,८२७ २०२४ मध्ये पात्र आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!