Tuesday, October 15, 2024

वयाची तिशी ओलांडल्यानंतर फॅमिली प्लानिंगचा विचार करताय? या ५ गोष्टी लक्षात ठेवा

माय महाराष्ट्र न्यूज:वयाच्या ३८ व्या वर्षी आई होताना अनेक समस्या निर्माण होतात का? फॅमिली प्लानिंग करताना पुरुषाचे आणि स्त्रीचे योग्य वय कोणते?

कामाचा वाढता व्याप, उशीरा लग्न करण्याची पद्धत यामुळे फॅमिली प्लानिंग करण्यासाठी हल्ली अनेक जोडपी उशीर करतात. तिशीनंतर आई होण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक प्रमाणात वाढले आहे.

जर तुम्ही देखील वयाची तिशी ओलांडली असेल आणि फॅमिली प्लानिंग करत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जाणून घेऊया.वाढत्या वयाबरोबर गर्भधारणा होण्यास त्रास होतोच पण प्रसुतीनंतर

अनेक धोके वाढतात. हिन्दुस्तान टाइमच्या वृत्तानुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल सिंघल यांनी सांगितले की, मुल जन्माला घालण्याचे योग्य वय हे २५ ते ३० वर्ष इतके आहे. वयाची ३५ शी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात.

किशोरवयीन किंवा वयाची विशी ओलांडल्यानंतर महिला (Women) अधिक सक्षम असतात. परंतु ३० शी नंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. तसेच प्रजनन क्षमता देखील कमी होते.

यामुळे मधुमेह (Diabetes), कमी वजनाचे बाळ (baby) तसेच सी सेक्शन डिलिव्हरी होण्याची शक्यता अधिक असते.

2. या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही वयाची तिशी ओलांडल्यानंतर फॅमिली प्लानिंग करत असाल तर गर्भधारणा समुपदेशन करा. यामध्ये तुमचे आरोग्याची चाचणी करा.

गर्भधारणेमध्ये कोणतीही समस्या टाळण्यासाठी लैंगिक संक्रमित रोगांचे स्क्रीनिंग देखील केले जाते.

तसेच तुमच्या आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव यांसारख्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्या.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिड सारखी प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे घ्या. रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी वजनही नियंत्रित ठेवा.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!