Monday, May 27, 2024

तुमचं रेशन कोणी घेत तर नाही ना? रेशनकार्डला मोबाईल नंबर लिंक करा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजकाल दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठी मोबाईल नंबरलिंक करणे गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात मिळत असलेल्या रेशनसाठी देखील

मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य झाले आहे. त्याशिवाय दर महिन्याला मिळणारे धान्य मिळण्यास अडचण येईल. त्यामुळे अनेक शिधा पत्रिका धारकाचे मोबाईल नंबर रेशनकार्डलालिंक करण्यात आले आहेत.

अशावेळी गैर व्यवहाराला आळा बसण्यास मदत होते आहे.सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना रास्त भावात धान्याचे वितरण केले जाते. पॉस मशिनद्वारे धान्याचे वितरण केले जात असले तरी

तांत्रिक अडचणी आल्यास ओटीपीचा वापर करून धान्याची उचल लाभार्थ्याला करता येते; परंतु संबंधित लाभार्थ्यांचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेशी संलग्न असणे आवश्यक आहे. स्वस्त धान्याचे वितरण करताना

स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे धान्य दुकानदारांकडे ग्राहकांकडून अनेक तक्रारीसुद्धा प्राप्त होतात. अशा प्रकारांवर आळा बसावा, स्वस्त धान्याचे वितरण

सुरळीत व निकोप पद्धतीने व्हावे, यासाठी पॉस मशिनवर धान्याचे वितरण केले जात आहे. एखाद्या कार्डधारकाने स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी मोबाइल ओटीपी सेवेचा लाभ घेतल्यास त्याच्या

मोबाइलवर धान्य घेतल्याचा संदेश प्राप्त होतो. येथील , अन्न पुरवठा निरीक्षक दीपक नागरगोजे म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जात आहे. शिधापत्रिकाधारकांनी

मोबाइल क्रमांक संलग्न करावा.शिधापत्रिकेला मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी संबंधित गावातील स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधावा. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधून मोबाइल क्रमांक जोडणीसाठी अर्ज करावा.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!