Monday, May 27, 2024

मोठी बातमी:भाजपाकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर ; तर महाराष्ट्रातील 

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी समोर आली आहे.

भाजपकडून 16 राज्य आणि 2 राज्यांमधील 195 जागेवर उमेदवारी निश्चित झाले आहे. नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर 34 केंद्रिय मंत्र्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

गुरुवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती बैठकीची आधी जेपी नड्डा, आमित शाह आणि नरेंद्र मोदी एकत्र आले होते.

ही बैठक जवळपास 3 तास चालली ज्यामध्ये उमेदवारांच्या मंजुरीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यूपी, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा,

गुजरात आणि इतर राज्यांचे पक्ष प्रमुख उमेदवारांच्या याद्यांसह पक्षाच्या सर्वोच्च निर्णय मंडळाच्या बैठकीत उपस्थित होते.राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशची निवडणूक समिती यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर

अंतिम चर्चा ही 29 मार्चला चर्चा झाली. यावेळी 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 145 जागांचा निर्णय झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार, 34 केंद्रीय

मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावं या यादीत आहे. लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. यामध्ये 28 मातृशक्ती (महिला), 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार,

अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आलं आहे”, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.भौगोलिक

क्षेत्र मोठे, प्रदेशात आम्ही मोठे, यासोबत एनडीएचा विस्तार करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सलग तिसऱ्यांदा निवडून येऊ. गेल्या दोन निवडणुकांपेक्षा जास्त

जागांवर आम्ही निवडून येऊ”, असं विनोद तावडे म्हणाले.उत्तर प्रदेशच्या 55 जागांची आम्ही घोषणा करत आहोत, प. बंगालच्या 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12,

तेलंगणा 9, आसाम 14 पैकी 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीर 2, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दिव-दमन 1, अशा 195 जागांची आम्ही घोषणा

करत आहोत”, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.वाराणसी येथून नरेंद्र मोदी, अंदमान निकोबार येथून बिष्णू पडा रे, अरुणाचल प्रदेश पूर्व किरण रिजिजू, अरुणाचल प्रदेश पश्चिममधून तापिर गाओ,

आसाम करिमगंजमधून अनुसूचित जातीकडून कृपानाथ मल्ला, सिलचरमधून परिमल शुक्ला बैद्य, ऑटोनमस जिल्हा शेड्यूल ट्राईब अरमसिंग इसो” अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!