Sunday, December 22, 2024

सुजय विखेंचे मोठं विधान: म्हणाले नंतर मी कायमचा 

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. “तुमच्या आशीर्वादाने मी नगरचा खासदार झालो. मात्र तुमच्यापासून दुरावला

गेलो आहे. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच येईल. काळजी करू नका”, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वक्तव्याचा नेमका

अर्थ काय? असाच प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज शिर्डी जवळील राहाता शहरात महिला बचत गटाला

साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाला मी दोन महिन्यानंतर उत्तर देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे.

शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे (शिर्डी) येईल. काळजी

करू नका”, असं वक्तव्य केल्याने सुजय विखेंना नेमकं म्हणायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.तसेच आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा

निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. तुम्ही आमच्या विरोधाकांना अपमानीत करून आमच्या मनामध्ये स्थान निर्माण कराल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज.

कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची ही शिकवण नाही”, अशा शब्दांत सुजय विखेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!