Sunday, December 22, 2024

लोकसभेसाठी प्रत्येक गावातून 2 अर्ज, 5000 उमेदवार देणार, बीडच्या मराठा बैठकीत ठरलं?

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जर मनोज जरांगे

पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

लोकसभेसाठी प्रत्येक गावातून 2 अर्ज, 5000 उमेदवार देणार आहेत. शिवाय मोदी -शाहविरुद्धही फॉर्म भरले जाणार आहेत. बीडमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातीलच उमेदवार नाही तर इतर समाजातील देखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या

विरोधात उभे करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजचं सरकारला घेरणार आहे. तर या बैठकीमध्ये महत्त्वाचे ठराव घेण्यात आले असून जोपर्यंत

सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एकमताने ठरवण्यात आल आहे.येऊ घातलेल्या निवडणूकीत

मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठींबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही. प्रचार सभेत सहभागी होणार नाही, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाही अशी शपथ घेण्यात आलीये.

सोबतच जरांगे पाटील यांना ईडी लावता येत नसल्याने त्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत केली जाणार आहे. या एसआयटीला प्रत्येक मराठा बांधव आमची देखील चौकशी करा, अशी मागणी करणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!