Monday, May 27, 2024

लोकसभा निवडणूक :भाजपाकडून महाराष्ट्रातील या माजी मंत्र्याला उमेदवारी

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने पहिली यादी आज शनिवारी २ मार्च रोजी जाहीर झाली.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढणार

असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याला उत्तर प्रदेशमधून उमेदवारी मिळाली आहे. ते म्हणजे, माजी

गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील जैनापूर येथून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यात एक लोकसभेचे अध्यक्ष आणि दोन राज्यांचे

मुख्यमंत्र्यांना संधी दिल्याचे तावडे यांनी सांगितले.भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. पहिल्या यादीत ज्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे त्यात वाराणसीमधून

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गांधीनगरमधून अमित शहा, उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत २८ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ४७ असे उमेदवार आहेत.

ज्यांचे वय ५० पेक्षा कमी आहे. यादीत २७ उमेदवार एस्सी तर १८ उमेदवार एसटी आहेत. तर ५७ उमेदवार हे ओबीसी असल्याचे तावडे यांनी सांगितले.

प्रमुख उमेदवार

वाराणसी – नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

गांधीनगर – अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)

अरुणाचल वेस्ट – किरण रिजिजू

गुना – ज्योतिरादित्य शिंदे

विदिशा – शिवराज सिंह चौहान (माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)

कोटा – ओम बिर्ला (लोकसभा अध्यक्ष)

अमेठी – स्मृती इराणी

लखनऊ – राजनाथ सिंह

मथुरा – हेमा मालिनी

राज्यानुसार उमेदवारी

उत्तर प्रदेश – ५१

पश्चिम बंगाल – २०

मध्य प्रदेश – २४

गुजरात – १५

राजस्थान – १५

केरळ – १२

तेलंगणा – ०९

आसाम – १२

झारखंड – ११

छत्तीसगड – ११

दिल्ली – ०५

जम्मू् काश्मीर – ०२

उत्तराखंड – ०३

अरुणाचल प्रदेश – ०२

गोवा – ०१

त्रिपूरा -०१

अंदमान निकोबार – ०१

दीव दमण – ०१

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!