माय महाराष्ट्र न्यूज:भाजपनं नुकतीच १९५ जागांवरील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यांपैकी एका उमेदवारानं काल आपली उमेदवारी
परत केली होती. याचं कारण त्यानं सांगितलं नव्हतं. पण आज पुन्हा एकदा एका उमेदवारानं आपलं लोकसभेचं तिकीट पक्षाकडं परत केलं आहे. विचारपूर्वक पक्षानं तिकीटं दिल्यानंतरही
हे का घडतंय जाणून घेऊयात.लोकसभेचा प्रचार सुरु होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशच्या बाराबंकीतून पुन्हा खासदारकीचं तिकीट दिलेले खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी आपलं तिकीट परत केलं आहे.
याच्या मागचं कारणंही समोर आलं आहे. रावत यांचा एक अश्लील व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळं त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि आपलं तिकीट परत केलं आहे. त्यांनी म्हटलं की,
जोपर्यंत मी या प्रकरणात निर्दोष ठरत नाही तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रावत यांचे सहकारी दिनेश चंद्र रावत यांनी पोलिसांत
तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. तसेच याची निष्पक्ष चौकशी करण्याचं आवाहनही केलं आहे. त्याचबरोबर आपल्या या कथित व्हिडिओवर खासदार
रावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, हा माझा व्हिडिओ नाही. हा AIच्या माध्यमातून बनवलेला डिपफेक व्हिडिओ आहे. यामध्ये माझा चेहरा लावण्यात आला आहे. २०२२ आणि २०२३ मधील
हे सर्व व्हिडिओ आहेत. मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं आहे. यामुळं माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी या प्रकरणी खटला दाखल केला आहे. ज्यांनी हे
घाणेरडं कृत्य केलं आहे त्यांच्याविरोधात कारवाई होईल.