Monday, May 27, 2024

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ:शिंदे गटाच्या आमदारांनी एअर हॉस्टेसचा विनयभंग केला’, सरोदेंचा गंभीर आरोप

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या आमदारांवर वकील असीम सरोदे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

“शिंदे गटाच्या आमदारांनी गुवाहाटीमधील एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी दारुच्या नशेत झिंग होऊन सर्व गोष्टी केल्या”, असा आरोप असीम सरोदे यांनी केला.

तसेच शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाणदेखील करण्यात आली, असा धक्कादायक दावा असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात

खळबळ उडाली आहे. असीम सरोदे यांनी धाराशिवमधील ‘निर्भय बनो’ सभेत याबाबतचे आरोप केले आहेत. दुसरीकडे असीम सरोदे यांच्या या आरोपांना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी

प्रतिक्रिया दिली. “महापत्रकार परिषदेतच कळालं सरोदे ठाकरे गटाचे पुढारी आहेत”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.“गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. त्यांना आठ

किलोमीटर गेल्यानंतर पकडून आणण्यात आलं. त्यांना गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी

मारहाण केली?”, असा सवाल असीम सरोदे यांनी केला.गुवाहाटीला जिथे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी

काही रुम्स बुक केलेल्या होत्या. त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी

केला? हे महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. दारुच्या नशेत झिंगत असलेल्या आमदारांनी या गोष्टी केल्या. हा पैशांचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही”, असं असीम सरोदे म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!