माय महाराष्ट्र न्यूज:सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभर ठप्प झाले आहे. युजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
त्यामुळे अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणींमुळे युजर्स चिंतेत असल्याचे दिसत आहे. मेटा प्लॅटफॉर्मच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामने अचानक काम करणे बंद केले आहे. त्यामुळे लाखो
वापरकर्त्यांनी ट्विटरवरून आणि इतर प्लॅटफॉर्मवरून याबद्दल तक्रार केली आहे.अचानक मोबाईल तसेच सर्व डिव्हाईसमधून फेसबुक Log Out झालं. सेशल एक्सपायर असा मेसेज आला.
तसेच Instagram देखील फिड रिफ्रेश होत नाहीत. Facebook आणि Instagram डाऊन झाले आहे. तांत्रिक अडथळा आल्याने फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहेत.
जगभरातील कोट्यावधी युजर्सना याचा फटका बसला आहे. रात्री 9 वाजल्यापासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम जाऊन झाले.फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर अनेकांनी सर्वप्रथम मोबाईल
नेटवर्क चेक केले. यानंतर अनेकांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर क्रॉस चेकिंग केले. फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर X वर मीम्सचा पाऊस पडला आहे.