भेंडा राहुल कोळसे: राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुहा येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थानस ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री मठाधिपती तारकेश्वर गड ता आष्टी जिल्हा बीड यांनी
आज सोमवार दिनांक 4 मार्च रोजी कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थानस भेट देऊन दर्शन घेतले व देवस्थान विषयी माहिती जाणून घेतली. यावेळी देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मोठ्या उत्साहात स्वागत गावकऱ्यांनी केले.यावेळी शास्त्री यांनी मंदिर विषय गावकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.तसेच मंदिर परिसरात थोडा वेळ घालवला. शास्त्री यांनी मंदीराला भेट दिल्यामुळे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी महेश महाराज काटेकर तांदुळवाडी , गागरे महाराज चिंचोली शरद कोळसे, नंदकुमार सौदागर, लहानु शेनकर , शुभम गागरे ,अनिल सौदागर, कैलास कोळसे , डॉ विजय वाबळे ,शंकर मांजरे ,सागर कोळसे,
बाबासाहेब कोळसे ,अमुल कोळसे, बच्चा सौदागर ,जगन्नाथ बाभुळके , स्वप्निल पेरणे , श्री धावणे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.