माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्हा बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून चालु वर्षीं आज अखेर अल्पमुदत शेती कर्जाकरिता 3211 कोटींचे
कर्ज वाटप केले आहे. 31 मार्च 2024 अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतकर्यांनी वेळेत भरणा करुन 3 लाखापर्यंतच्या पिक कर्जास शुन्य टक्के व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन
जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. जिल्हा बँक आयोजीत जिल्ह्यातील वि.का.से. सोसायटीचे सचिव, जिल्हा बँक शाखाधिकारी, वसूली अधिकारी
यांच्या संयुक्त कर्ज वसूली आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, बँकेच्या संचालिका गितांजली शेळके, संचालक अमोल राळेभात,
सरव्यवस्थापक जयंत देशमुख आदी उपस्थित होते.अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे बोलताना कर्डिले म्हणाले, महाराष्ट्र शासनाने पिक कर्ज वसूलीला स्थगिती
दिली असली तरी शासनाने या कर्जाचे पूनर्गठण करुन देण्याबाबत सुचना केल्या आहेत. परंतु अशा प्रकारचे कर्जाचे पुनर्गठण केल्यास पुणर्गठण तारखेपासून या कर्जास 11 टक्के व्याजदर परवडणारा नसल्याने
शेतकर्यांनी आपले कर्ज 31 मार्च पुर्वीच भरुन शुन्य टक्क्याचा लाभ घ्यावा. या मुदतीत पिक कर्ज भरणार्यांना 10 एप्रिलच्या आत पुन्हा पिक कर्ज दिले जाणार आहे. या प्रसंगी
संचालक प्रशांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. आभार सरव्यवस्थापक एन. के. पाटील यांनी मानले.