माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही शहरी भागात राहत असाल किंवा ग्रामीण, तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही त्या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकता. मोफत किंवा स्वस्त रेशन,
पेन्शन, विमा, मोफत शिक्षण, घरे बांधण्यासाठी अनुदान यासारख्या योजनांसोबतच इतर अनेक फायदेशीर योजनाही केंद्र सरकार राबवत आहेत.यातच एक आरोग्याशी संबंधित योजना आहे. ज्याचे नाव ‘आयुष्मान
भारत योजना’ आहे. या योजनेत लाभार्थ्यांना मोफत उपचार दिले जातात. मात्र तुमच्या शहरात किंवा गावातील कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का? नाही, तर याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
आयुष्मान भारत योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चालवली जात आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत पात्र लोकांचे आयुष्मान कार्ड बनवले जातात. यानंतर कार्डधारकाला
या कार्डद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात. यामध्ये पात्र व्यक्तीला त्याच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. त्यानंतर तुम्ही या कार्डाच्या मदतीने सूचीबद्ध रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता.
अशा पद्धतीने पाहता येईल रुग्णालयाची यादी:तुम्ही देखील आयुष्मान कार्डधारक असाल आणि तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा गावातील कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार
मिळू शकतात हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला pmjay.gov.in या योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.येथे तुम्हाला ‘फाइंड हॉस्पिटल’ हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.यानंतर
आपले राज्य, जिल्हा आणि रुग्णालयाचा प्रकार यासारखी उर्वरित आवश्यक माहिती प्रविष्ट करा.त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरा.आता तुम्हाला अशा रुग्णालयांची यादी दिसेल जिथे तुम्हाला मोफत उपचार मिळू शकतात.