माय महाराष्ट्र न्यूज:सध्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाराष्ट्रात रोज नवनव्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. तशातच
महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी एकेरी जागांवरच समाधान मानायला सांगत असल्याच्या बातम्या येत आहेत. या मुद्द्यावरून आज संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. त्यांना लोकसभेच्या जागांसाठी दिल्ली भांडी घासावी लागतात, असे ते म्हणाले.ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली म्हणतात
त्यांना वेळोवेळी दिल्लीत जावे लागते. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना लोकसभेच्या जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागतात. डुप्लिकेट शिवसेनेची अशी अवस्था होणार हे निश्चित आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अभिमानाने आतापर्यंत लोकसभेच्या २३ जागा लढल्या आहेत. यावेळीही लढणार आहोत. डुप्लिकेट शिवसेनेच्या वाट्याला ५ जागाही येत नाहीत. पाच जागांचे तुकडे
कुत्र्यापुढे हाडूक फेकावं त्याप्रमाणे फेकल्याची बातमी मी वाचतोय,” अशी अतिशय बोचरी टीका संजय राऊतांनी शिंदे गटाबाबत बोलताना केली.अजित पवारांची दोन-चार जागांवरच बोळवण
करतायत (असंही मी ऐकलं). डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये. यांचा अस्त जवळ आला आहे. व्यापाऱ्यांपुढे ते काय जोर लावणार, त्यांच्यात एवढी हिंमत
आहे का? जोर लावून दाखवावा. आम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडलो. तुम्ही भांडत बसा त्यांची..”, असा टोला त्यांनी लगावला.