Wednesday, December 17, 2025

भेंडा शिवारातील घटना;हॉटेलच्या बिलावरून एकास चाकूने मारहाण

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील नेवासा-शेवगावरोड वरील भेंडा बुद्रुक शिवारातील हॉटेल यशदीप मध्ये जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून दोघा व्यक्तिंनी हॉटेल चालकास पोटात चाकू मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबद्दल पोलिसांकडून मिळालेल्या माहिती वरून आज शनिवार दि.९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास कुकाणा येथे अतुल राजेंद्र उर्फ राजकुमार खाटीक याच्या यशदीप हॉटेलमध्ये मुस्लिम समाजाचे साहिल बशीर पठाण व जाफर बशीर सय्यद हे दोघे जेवायला गेले असता बिल देण्याच्या कारणावरून या दोघांनी खाटीक अतुल खाटीक याचे पोटामध्ये चाकू मारून जखमी केले आहे. जखमीला नगर येथे उपचारा साठी नेण्यात आले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटना स्थळी भेट दिली असुन पोलिसांनी
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहेत. दोघांवर यापूर्वी CR 916/2022 अन्वये भा.द.वी. क. 307, 34 चा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान भेंडा येथील पोपट वाघडकर या व्यक्तीला या दोघांनी गावठी कट्टा दाखवून धमकावल्याची माहिती खुद्द वाघडकर यांनी दिली.तर या घटनेला पोलीस निरीक्षक श्री.जाधव यांनी दुजोरा दिला असून शोध मोहीम सुरू असल्याचे सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!