Monday, May 27, 2024

मोठी बातमी :शरद पवारांची भोरमध्ये मोठी घोषणा म्हणाले आज मी तुमच्यासमोर 

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सुप्रिया सुळेंचे संसदेतील काम बोलकं आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार जाहीर करतो असं सांगत शरद पवारांनी (Sharad Pawar) सुप्रिया सुळे

यांच्या नावाची घोषणा केली आहे. संग्राम थोपटेंनी आपल्योसोबत राहावे, शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो ते मी दाखवून देईन असंही ते म्हणाले. ते भोरमधील सभेत बोलत होते.

सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी या सभेचं नियोजन केलं होतं.

त्यामध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.भोरचे आमदार

संग्राम थोपटे यांचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचा गेल्या 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. त्यांचा हा संघर्ष पुढच्या पीढीमध्ये म्हणजे अजित पवार आणि संग्राम थोपटेंमध्येही

असल्याचं दिसून येतंय. आता बदलत्या राजकारणाचा वेध घेत शरद पवारांनी भोरच्या सभेच्या आधी अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि हा 40 वर्षाचा संघर्ष मिटवला. त्यामुळे

थोपटे यांचे वजन आता सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडणार हे निश्चित झालं असून त्यामुळे अजित पवारांची मात्र अडचण वाढणार असल्याचं दिसून येतंय. मी जेव्हा देशाचा कृषीमंत्री झालो तेव्हा देशात फक्त

एक महिना पुरेल एवढा अन्नाचा साठा उपलब्ध होता. अनेक निर्णय घेऊन ही परास्थिती बदलली. एक दिवशी यवतमाळातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी मनमोहनसिंग यांना भेटलो आणि त्यांना

म्हटले की आपण या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याने आत्महत्या का केली हे पाहिले पाहिजे. आम्ही गेलो आणि कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याच समजलं. त्यानंतर आम्ही

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यचा निर्णय घेतला असे पवार म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!