शेवगाव
शेवगाव तालुक्यातील बेलगावचा ताजनापूर टप्पा क्रमांक दोन योजनेमध्ये समावेश करून तातडीने बंधारे पाण्याने भरून देण्यात यावेत अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी केली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात डॉ. घुले यांनी म्हंटले आहे की, मौजे बेलगाव येथे सध्या भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बेलगावचा ताजनापुर टप्पा क्रमांक २ योजनेत समावेश करुन गावातील सर्व बंधारे पाण्याने भरुन देण्यांत यावेत त्यामुळे काही प्रमाणा मध्ये सध्याची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल.
शेवगाव तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये जनावरांच्या चाऱ्या, पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने मोठया दुष्काळी परिस्थितीला बेलगावच्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने पाणी योजनेत गावच्या समावेशा बरोबर बेलगाव, वरखेड, आंतरवाली खुर्द, आंतरवाली बुद्रक या गावातील बंधारे भरून देण्याची सर्व शेतकऱ्यांसमवेत कार्यकारी अभियंत्यांना मागणी करण्यात आली.
ज्ञानदेव पोपळे, राजेंद्र थोरात,श्रीधर काकडे, नवनाथ जाधव, बंडु लोहकरे,राम काकडे, कल्याण सुरासे,एकनाथ कसाळ, हनुमान पातकळ, आदित्य लांडे,सोहम धावण आदी यावेळी उपस्थित होते.