Monday, May 27, 2024

भाजपाकडून महाराष्ट्रातील किती खासदारांचा पत्ता कट होणार? इतक्या उमेदवारांच्या घोषणेची आज शक्यता

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज येण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील 25 जागांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची

माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , बीडमधून पंकजा मुंडे , चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार,जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे

यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते.भाजपने या आधी 195 जणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यानंतर आता दुसरी

यादी आज जाहीर होण्याची शक्यता असून त्यामध्ये राज्यातील 25 जणांच्या उमेवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत 2019 साली जिंकलेल्या 23 जागा आणि पराभूत

झालेल्या चंद्रपूर आणि बारामती या दोन, अशा 25 जागांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या जागांवर आता उमेदवार घोषित केले जाणार आहेत. चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना

निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाऊ शकतं. तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपकडून जवळपास 34 जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती

समोर येत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपकडून शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांना

तिकीट देऊ नये अशी सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये हातकणंगलेचे धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांची नावं आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!