माय महाराष्ट्र न्यूज:राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी सीईटी
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता १५ मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन
अर्ज सादर करता येणार आहे.प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी सीईटी’ ही सामाईक
प्रवेश परीक्षा (पीसीबी/पीसीएम ग्रुप) १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.या परीक्षेसाठी आतापर्यंत सात
लाख १२ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सीईटी सेलने अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पाचशे रुपये
अतिरिक्त विलंब शुल्कासह १५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची तपासणी केली असता अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण
असल्याचे ‘सीईटी सेल’च्या निदर्शनास आले. त्यामुळे सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी यापूर्वी प्रवेश परीक्षा कक्षाने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे.परंतु, तरीही ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणारे
विद्यार्थी परीक्षा देण्याच्या संधीपासून वंचित राहू नयेत, म्हणून विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका,
अर्ज कसा भरायचा, यासंदर्भात संपूर्ण माहिती प्रवेश परीक्षा कक्षाच्या ‘www.mahacet.org’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’ने दिली आहे.
‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज करण्याचा कालावधी –
तपशील : कालावधी
-विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे : १५ मार्चपर्यंत
-ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत : १६ मार्च