Saturday, December 21, 2024

मोठी बातमी:मराठ्यांची ९०० एकरवरील विराट सभा कधी होणार? मनोज जरांगेंनी थेट सांगूनच टाकलं

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडमध्ये मराठा समाज एकवटणार असून तब्बल ९०० एकरमध्ये जंगी सभा घेणार, अशी घोषणा मराठा

आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यामुळे आता या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. मात्र, ही सभा नेमकी कधी होणार? असा मराठा बांधवांना प्रश्न पडला आहे. याबाबत

मनोज जरांगेंनी मोठी माहिती दिली आहे.विराट सभा घेण्यासाठी आम्हाला ९०० एकर जागा मिळाली आहे. मात्र, आम्ही अजूनही पार्किंगसाठी जागा शोधतोय. लवकरच सभेचं ठिकाणी आम्ही सांगू,

असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांना सांगितलं. ते लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे बोलत होते.राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) १० टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणीही

सुरू केली आहे. मात्र, हे आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. तसेच सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने

अंमलबजावणी करा, अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे. यासाठी जरांगेंनी संवाद यात्रा काढली असून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत. मंगळवारी

(ता.१२) जरांगे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करत माध्यमांसोबत संवाद साधला.मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून गृहमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी विनाकारण मराठा समाजात द्वेष पसरवला आहे, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन

 

राज्य सरकारने कारस्थान रचलं असून हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!