माय महाराष्ट्र न्यूज:भाजपची देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातली पहिली लोकसभा निवडणूक उमेदवारांची यादी आज घोषित होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून
किमान १३ किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या पहिल्या यादीत काही मंत्री, आमदारांसह दिग्गजांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच पहिली यादी जाहीर केली. आज पक्षाच्या वतीने दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची
सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा
या राज्यांमधील जागांवर चर्चा करण्यात आली. १३ मार्चनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात भाजपासह काँग्रेस, तृणमूल काँग्रेसनेही उमेदवार यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या
बैठकीत १०० जागांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपा लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.महाराष्ट्रातील २५ जागांबाबत भाजपाच्या बैठकीत चर्चा झाली असून
ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. यात नितीन गडकरींना नागपूर, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, जालना रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच आजच भाजप देश पातळीवर उमेदवारांची दुसरी यादी घोषित करणार असल्याचे आणि यात महाराष्ट्रातील 12 ते 15 उमेदवारांची नावे घोषित होणार असल्याची माहिती मिळत आहे.यात नगर दक्षिणेच्या
नावाची घोषणा होणार असल्याचे समजते आहे. विद्यमान खा.सुजय विखे यांच्या बद्दल विविध पातळीवर चर्चा होऊन आणि पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या विद्यमान खासदारांच्या यादीत सुजय विखे यांचे नाव अंतिम झाल्याने आज जाहीर होणाऱ्या
यादीत त्यांचे नाव असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.ज्या मतदारसंघात पुन्हा निवडून येणाची खात्री असलेल्या विद्यमान खासदारांची नावे आज जाहीर होणाऱ्या यादीत असणार असून यात खा.सुजय विखे यांचे नाव असू शकते.