माय महाराष्ट्र न्यूज: नगर व नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून, स्वामी शांतीगिरी महाराज महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.
मात्र, कालच शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी केल्याने शांतिगिरी महाराज नाराज आहेत. त्यामुळे आता शांतिगिरी महाराजांनी
महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या निर्णय घेतला आहे.महाराज यांचा नगर व नाशिक जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे.नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यावर
शांतिगिरी महाराज ठाम आहेत. यासाठी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे
नेते तथा नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. असे असतांना शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आली.
त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने शांतिगिरी महाराज यांच्याकडून आता महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची हालचालींना वेग आला आहे. स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून
निवडणूक लढवणार असल्याची इच्छा यापूर्वीच जाहीर केली आहे. तर, महायुतीकडून ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
देखील घेतली होती. शिंदे गटाकडून महाराजांना उमेदवारी मिळेल अशी त्यांच्या भक्तांची अपेक्षा होती. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने, शांतिगिरी महाराजांकडून महाविकास आघाडीचा
पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली जाते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.