Monday, May 27, 2024

पुन्हा अवकाळी पाऊस होणार; पुढील ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार, IMD अंदाज

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट चालून आलं असून पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह

मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील

पीके काढून घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आला.राज्यात अवकाळी पावसाचं सत्र काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत आहे.

त्यामुळे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह (Heavy Rain) गारपीट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान विभागाने पुन्हा विदर्भाला विजांच्या

कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात

आलाय. खान्देशातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.दुसरीकडे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर मुंबईसह पुणे शहरातील तापमानात एक ते दोन

डिग्रीने घट होणार असून पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, राज्यावर एकीकडे पावसाची

शक्यता असतांना दुसरीकडे काही जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमानाचा

पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळ गेलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!