Monday, May 27, 2024

नगर लोकसभा विखे विरुद्ध लंके सामना रंगणार? 

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

दुसरीकडे, कालच भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, ज्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना

पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत लंके यांना संधी मिळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. अशावेळी शरद पवार गटात प्रवेश करून निलेश लंके अहमदनगर दक्षिण

लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे, आजच्या पक्षप्रवेशासोबतच लंके यांची उमेदवारी देखील जाहीर होते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

निलेश लंके अजित पवारांची साथ सोडून पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र, अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते.

राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात. राजकारणात पुढे काय होणार आहे? हे कोणालाच माहिती नसते.

लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही, असे लंके म्हणाले होते. मात्र, आता आज त्यांच्या

शरद पवार गटातील पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके

हे आज दुपारी चार वाजता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरु होत्या. आमदार निलेश लंके हे

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. काल भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलल जात आहे. आज या प्रवेशासोबतच त्यांना

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!