Thursday, February 12, 2026

पवारांनी डाव टाकला, निलेश लंकेंचा आज प्रवेश ?

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर

दुखावलेले निलेश लंके यांनी अजित पवार गटाला रामराम करण्याचा निर्णय घेऊन गुरूवारी सायंकाळी चार वाजता ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटात प्रवेश

करणार आहे अशी शक्यता आहे. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्याच अनुषंगाने मागील दोन वर्षापासून ते लोकसभेची तयारी करत आहेत.

परंतु महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने किंबहुना विद्यमान खासदार भाजपचा असल्याने साहजिक सुजय विखे यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली. त्यामुळेच निलेश लंके

यांनी पवार गटात प्रवेश करून विखेंविरोधात शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे.लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जायचे, की उपमुख्यमंत्री अजित पवार

यांच्यासोबतच राहायचे, अशा कोंडीत सापडलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी अखेर शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. निलेश लंके परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या काही

दिवसांपासून सुरु होती. खासदार अमोल कोल्हे यांनीही लंकेंना परतीची साद घातली होती. अखेर भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या यादीत सुजय विखे यांचं नाव जाहीर झाल्याने लंके

यांच्या पवार गटातील पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.गुरुवारी सायंकाळी निलेश लंके हे शरद पवार यांच्या उपस्थितीत घरवापसी करतील अशी शक्यता आहे. पुण्यातील शरद पवार

यांच्या निवासस्थानी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. याच पत्रकार परिषदेत निलेश लंके आपली भूमिका स्पष्ट करून विखेंविरोधात लढाईचं रणशिंग फुंकतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या

फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार लंके हे शरद पवार गटात घरवापसी करणारे पहिलेच आमदार ठरणार आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातली गणिते लक्षात घेऊन

लंकेंची उमेदवारी विखेंना जड जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!