नेवासा
राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधन भरिव वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया अहमदनगर जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कोलते यांनी व्यक्त केली.
बुधवार दि.१३ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस पाटलांच्या मानधनात ६५०० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या पोलीस पाटलांना प्रतिमाह ६५०० रुपये मानधन मिळते.या निर्णयाने
आता प्रतिमाह आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे.राज्यातील ३८ हजार ७२५
पोलीस पाटलांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. पोलीस पाटलांचे मानधनात
वाढ केल्या बद्दल श्री.कोलते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.