Monday, April 29, 2024

लोकसभा निवडणूक: नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात या तारखेला मतदान 

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत.

देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल.

संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल.देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा, नवी दिल्लीतील विज्ञान भवन (Vigyan Bhawan) येथे केंद्रीय निवडणूक

आयोगाचे (Election Commission of India) मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) आणि आयुक्त सुखविंदर संधू (Sukhbir Singh Sandhu ), ज्ञानेश कुमार (Shri Gyanesh Kumar ) यांनी केली.

मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस.एस.सिंह आणि ज्ञानेश कुमारही हजर होते. 2024 हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं.

महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान?

महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा मतदान होणार आहे.

543 लोकसभा जागा

देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होईल.

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल : नॉर्थ इस्ट, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड,

दुसरा टप्प्यातील मतदान 26 एप्रिल –

तिसरा टप्पा 7 मे मतदान –

चौथा टप्पा 13 मे मतदान —

पाचवा टप्पा 20 मे मतदान –

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदान: 13 मे रोजी मतदान होणार आहे व  शिर्डी लोकसभा मतदान:13 मे रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

 भारतीय निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष असते. यावर्षी जगभरात सर्वत्र निवडणुकांचे पर्व सुरू आहे. देशात एकूण 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.दे शात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र,

55 लाखांपेक्षा अधिक EVM, 1.2 कोटी प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख , 1.5 कोटी निवडणूक अधिकारी, 18 ते 21 वयोगटातील

मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!