भेंडा/नेवासा
पक्ष-जात,संघटना मठ- मंदिरे,श्रद्धेची स्थाने भिन्न असली तरी समाज आणि राष्ट्रहितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. देशावर आघात होतो,त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र आहोत हे दाखवून दिले पाहिजे.सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला धार्मिक आणि सामाजिक कार्य करायचे आहेत.त्यासाठी मठ-मंदिरे ही आपली ऊर्जा केंद्र आहेत असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केले
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीक्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साजरी करण्यात येणाऱ्या हनुमान जयंती व त्यानिमित्त होणाऱ्या श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी भागवताचार्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचे धर्मध्वजारोहण
सोमवार दि.१८ रोजी सांयकाली भास्करगिरिजी महाराज व
अप्पा महाराज यांचे हस्ते झाले आहे. त्यावेळी ते बोलत होते.भेंडा येथील पावन दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार पांडुरंग अभंग ,सुनील गिरी महाराज,महंत आप्पा महाराज, गणेशानंदगिरीजी महाराज,अंकुश महाराज कादे,बालू महाराज कानडे,राहुल ठोंबरे आदि उपस्थित होते.
सुनिलगिरी महाराज, महंत आप्पा महाराज,पांडुरंग अभंग ही यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नेवासा तालुक्यातील भाविक व श्रीराम सेवा मंडळाचे स्वंयसेवक उपस्थित होते. बप्पासाहेब कमानदार,संजय निळ, सौ.गयाबाई गर्जे यांनी उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.गणेशगुरु कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.श्रीराम सेवक बापूसाहेब नजन यांनी आभार मनले.